Tiranga Times Maharastra —
पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुन्हा एकदा महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. सध्या तुरुंगात असलेल्या बंडू आंदेकरने 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कागदपत्रे अपुरी असल्याने त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नव्हता. आज 29 डिसेंबर रोजी तो पुन्हा अर्ज दाखल करणार आहे. पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने त्याला सशर्त परवानगी दिल्यानंतर येरवडा केंद्रीय तुरुंगातून पोलिस व्हॅनमधून भवानी पेठ येथील सरकारी केंद्रात त्याला आणण्यात आले होते. या वेळी त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला असून दोन्ही हात रशीने बांधलेले होते. सरकारी केंद्रात नेत असताना आंदेकरने स्वतःसाठी ‘आंदेकरला मत म्हणजे विकासाला मत’ अशी घोषणाबाजी केल्याने मोठी चर्चा रंगली आहे.
